खात्यात पैसे नाही, टेन्शन नको; वापरा UPI Now, Pay Later
तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकता.
तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
४ सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) बँकांना त्यांच्या UPI युझर्सना क्रेडिट लाइन सुविधा देण्याची परवानगी दिली आहे.
आत्तापर्यंत, ग्राहक फक्त त्यांचे बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड UPI प्रणालीशी लिंक करू शकत होते.
पण आता तुम्ही तुमच्या प्री अप्रुव्ह्ड क्रेडिट लाइनचा वापर करून UPI व्यवहार देखील करू शकता. पाहूया हे कसं काम करतं.
ही एक प्रकारची ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे, जी बँका त्यांच्या UPI युझर्सना देत आहेत. ही सुविधा गुगल पे, पेटीएम, मोबिक्विक किंवा इतर कोणत्याही UPI अॅपवर वापरली जाऊ शकते.
दरम्यान, ही सुविधा अॅक्टिव्ह करण्यासाठी प्रथम बँकेची परवानगी घ्यावी लागेल. ही क्रेडिट लाइन मंजूर झाल्यावर, तुम्ही ही क्रेडिट लाइन UPI द्वारे वापरू शकाल.
काही बँका ही सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे वन टाईम चार्जे घेतात. HDFC बँक यासाठी सुमारे 150 रुपये आकारते.
एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना सध्या, तुम्ही ही सुविधा वापरून फक्त UPI पेमेंट करता येतं. तुम्ही ही सुविधा वापरून कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.
वेगवेगळ्या बँका ही सुविधा अॅक्टिव्ह करण्यासाठी, ती वापरण्यासाठी आणि पेमेंट वेळेवर न करण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारू शकतात.