Tap to Read ➤
स्किन टोननुसार करा फेशियल, त्वचा होईल सुंदर
त्वचेच्या रंगानुसार फेशियल करणे फायदेशीर असते.
आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण अधिक काळजी घेतो. परंतु, त्वचेच्या रंगानुसार फेशियल करणे फायदेशीर असते.
जर आपली त्वचा जास्त तेलकट असेल तर पर्ल फेशियल चांगले राहिल. यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होते. चेहऱ्याची खोलवर स्वच्छता होते.
आपली त्वचा अधिक निस्तेज किंवा कोरडी दिसत असेल. तर गोल्ड फेशियल करु शकता. यामुळे त्वचेला चमक येते आणि त्वचा हायड्रेट होते.
क्लासिक फेशियल हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर करता येते. यामध्ये चेहऱ्याची स्वच्छता, स्क्रबिंग, स्टीमिंग, मसाज, मास्क या गोष्टी केल्या जातात.
फ्रूट फेशियल हे एक नैसर्गिक फेशियल आहे. जे कोणत्याही त्वचेसाठी चांगले असते. हे त्वचा खोलवर स्वच्छ करते आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर करते.
त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी अँटी-एजिंग फेशियल केले जाते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, डार्क सर्कलच्या समस्या कमी होतात.
चॉकलेट फेशियल हे त्वचेला पोषण देते आणि चेहऱ्याची चमक वाढवते. ज्यामुळे निस्तेज चेहरा अधिक सुंदर दिसतो.
उन्हामुळे त्वचेला होणारे नुकसान दूर करण्यासाठी डी टॅन फेशियल उपयुक्त आहे. यामुळे त्वचा तरुण, चमकदार आणि ग्लोइंग होतो.
क्लिक करा