Tap to Read ➤

इच्छापूर्तीसाठी गुरुवारी करा 'हे' सोपे उपाय!

इच्छा तिथे मार्ग यानुसार ज्योतिष शास्त्राने गुरुवारचे तोडगे सांगून इच्छापूर्तीचा मार्ग दाखवला आहे, त्याचे अनुसरण करा.
१. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घालून संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गुरुचे नामस्मरण करा.
२. शीघ्र विवाहासाठी गुरुवारी उपास करा, विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसा.आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करा.
३. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी भगवान लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा.
४. घरातून दारिद्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषतः स्त्रियांनी केस धुऊ नये. तसेच या दिवशी नखे कापू नये.
५. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
६. हळदीची गाठ पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून उजव्या भुजेवर बांधावे.
७. २७ गुरुवार पर्यंत गुरुवारी केशराचा टिळा लावा, त्यामुळेही इच्छापूर्तीचे मार्ग खुले होतात.
८. घरात सूर्यफुलाचे रोप लावावे. आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि प्रगति होईल.
९. माता-पिता, गुरुजन आणि अन्य पूजनीय व्यक्तींच्या प्रति आदर आणि सन्मानाचा भाव ठेवावा. एकत्र कुटुंबात राहावे.
१०. गुरुवारच्या दिवशी पिठाच्या पेढ्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि हळद टाकून गाईला खाऊ घालावी.
११. गुरुवारच्या दिवशी 'ॐ बृं बृहस्पतये नमः!' मंत्राचा जप करावा. गुरुप्रदोष व्रत करावे.
१२. गुरुच्या संबंधित उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुचे नक्षत्र (पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा) आणि गुरूच्या होरा मध्ये केल्यास जास्त उत्तम.
क्लिक करा