सिराजसोबत डेटिंगची चर्चा; क्रिकेटर अजून गप्पच; पण ती म्हणाली...
क्रिकेटरचे एखाद्या अभिनेत्रीसोबत नाव जोडले जाणे ही काही नवी गोष्ट राहिली नाही, आता....
क्रिकेटर अन् अभिनेत्री यांच्यातील अफेअर्सच्या गोष्टी काही नव्या नाहीत. सध्याच्या घडीला मोहम्मद सिराज अन् माहिरा शर्मा ही जोडी रिलेशनशिमध्ये असल्याची चर्चा रंगत आहे.
दोघांच्यात रंगलेल्या प्रेमाच्या खेळाच्या चर्चेमुळे ज्या ज्या वेळी माहिरा कुठं जाते किंवा एखादी पोस्ट शेअर करते त्यावेळी तिला सिराजबद्दल विचारले जाते.
हीच गोष्ट क्रिकेटरबद्दलही घडते. त्याने जरी सोशल मीडियावर पोस्ट केला तर त्यावर माहिरा शर्मासंदर्भातील कमेंट पाहायला मिळतात.
क्रिकेटर मोहम्मद सिराजनं अभिनेत्री माहिराची पोस्ट लाइक केल्यावर दोघांच्यात काहीतरी शिजतंय, अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. सिराज यावर अजून तरी मौनच बाळगून आहे.
पण आता एका मुलाखतीमध्ये माहिरा शर्मानं खरं काय ते सांगितल्याची गोष्ट चर्चेत आहे.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री माहिरा शर्मा हिला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोहम्मद सिराजसोबतच्या रिलेशनसंदर्भा रंगणाऱ्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर माहिरा शर्मा म्हणाली की, मी कुणाशीही डेट करत नाही. याआधी तिच्या आईने मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा यांच्याबद्दल रंगणाऱ्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असे म्हटले होते.