Tap to Read ➤
तुझ्यात जीव रंगला! राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक अंदाज
अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे.
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने निरोप घेतला असला तरी ही मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
मालिकेत या जोडीने राणादा आणि अंजली नावाचं पात्र साकारून चाहत्यांची मनं जिंकली.
विशेष म्हणजे या मालिकेच्या सेटवर ही जोडी प्रेमात पडली आणि त्यांनी लग्नगाठ सुद्धा बांधली.
अलिकडेच अक्षयाने अभिनयातून ब्रेक घेत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर हे दोघेही कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात.
नुकताच हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या दोघांचा एक सुंदर फोटो शेअर केलाय.
या फोटोंमध्ये राणादा आणि पाठकबाई फारच गोड दिसत आहेत.
क्लिक करा