Tap to Read ➤
Shivani Sonar: नवरी नटली!
'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
उत्तम अभिनय आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर
शिवानीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
शिवानीने यापूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आहे.
सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने' मालिकेत काम करताना दिसते आहे.
मालिकेत शिवानी 'गौरी' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
दरम्यान, सुबोध भावे-शिवानी सोनारची 'तू भेटशी नव्याने' मालिका एका रंजक वळणावर आली आहे.
अभिमन्यू सर आणि गौरी यांचं लग्न होणार आहे.
गौरीच्या घरी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे.
याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
शिवानी सोनार नववधूच्या रुपात फारच गोड दिसते आहे.
क्लिक करा