प्रवासात होतोय उलटीचा त्रास?, मग हा फायनल उपाय करुनच बघा

अनेक उपाय करुन किंवा औषधोपचार करुनही हा त्रास कमी होत नाही?

अनेकांना कारने किंवा बसने प्रवास करतांना उलटीची समस्या होते. 

अनेक उपाय करुन किंवा औषधोपचार करुनही हा त्रास कमी होत नाही.

आज आपण असे काही सोपे उपाय पाहुयात ज्यामुळे तुमची उलटीची समस्या नक्कीच कमी होईल.

ज्यांना प्रवास करतांना उलटी होते त्यांनी प्रवासादरम्यान लिंबाच्या रसाचं १ चमचा सेवन करा. किंवा, लिंबाची फोड चघळा. यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.

बस वा कारमध्ये बसण्याच्या १० मिनिटांपूर्वी आल्याचा लहानसा तुकडा चघळा. तसंच प्रवासात उलटीची भावना निर्माण झाल्यास पुन्हा आल्याचा तुकडा किंवा आवळा कँडी खा.

प्रवास करण्यापूर्वी जास्त तेलकट, मसालेदार किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नका.

अनेकदा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळेही मळमळ होते. त्यामुळे प्रवास सुरु झाल्यावर एकदा दीर्घश्वास घ्या. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रवास वाढेल.

मळमळ झाल्यास लवंग किंवा वेलची चघळा.

'ही' ट्रीक वापरली तर ८ दिवस गजरा राहील फ्रेश!

Click Here