Tap to Read ➤

२०२३ मध्ये 'या' ५ आयपीओंनी करुन दिली जबरदस्त कमाई

पाहा कोणते आहेत हे आयपीओ ज्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल.
टाटा टेक्नॉलॉजीज, डीओएमएस इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, आयआरईडीए आणि सेलो वर्ल्ड २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारे आयपीओ ठरलेत.
टाटा टेकचा प्राईज बँड ४७५-५०० रुपये प्रति शेअर होता. या शेअरनं एलआयसीचा सर्वाधिक सबस्क्राईब होण्याचा रेकॉर्डही तोडला होता.
हा शेअर सध्या १२०४ रुपयांवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांना या शेअरनं आतापर्यंत १४१ टक्क्यांपेक्षा अधिक कमाई करून दिलीये.
डीओएमएसचा शेअर ७५०-७९० रुपयांच्या आयपीओ मूल्याच्या तुलनेत ७० टक्क्यांनी वाढून १३५१ रुपयांवर ट्रेड करत आहे.
जेएसडब्ल्यू एन्फ्राचा प्राईज बँड ११३-११९ रुपये प्रति शेअर होता. हा शेअर आता २१४.३५ रुपयांवर व्यवहार करतोय.
इरेडाचा प्राईज बँड ३०-३२ रुपये प्रति शेअर होता. हा शेअर आता १०९ रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे.
यानं आपल्या गुंतवणूकदारांना २४३ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलेत.
क्लिक करा