दररोज १ तास पोहण्याचे 'हे' १० फायदे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

पोहायला जाणे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आरोग्यासाठी एक उत्तम 'फुल बॉडी वर्कआउट' आहे.

संपूर्ण शरीराचा व्यायाम: पोहताना हातापायांपासून ते पोटाच्या स्नायूंंपर्यंत सर्व स्नायूंचा वापर होतो, त्यामुळे शरीराला चांगला आकार मिळतो.

हृदयविकारांपासून संरक्षण: पोहण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय अधिक कार्यक्षमतेने काम करू लागते.

वजन कमी करण्यास मदत: एका तासाच्या पोहण्यामुळे जिममधील व्यायामापेक्षा जास्त कॅलरीज जळतात, ज्यामुळे वेगाने वजन कमी होते.

हाडांच्या सांध्यांसाठी सुरक्षित: धावणे किंवा जिम करणे यामुळे सांध्यांवर ताण येऊ शकतो, पण पाण्यामध्ये शरीराचे वजन कमी जाणवत असल्याने सांधेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

फुफ्फुसांची क्षमता वाढते: पाण्याखाली श्वास रोखून धरण्याच्या प्रक्रियेमुळे फुफ्फुसे मजबूत होतात आणि श्वसनाचे विकार कमी होतात.

मानसिक ताण कमी होतो: पोहण्यामुळे मेंदूमध्ये 'एंड्रॉर्फिन' नावाचे आनंदी संप्रेरक तयार होते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.

लवचिकता वाढते: पाण्यातील हालचालींमुळे शरीराची लवचिकता (Flexibility) वाढते आणि स्नायू मजबूत होतात.

मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण: नियमित पोहण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

चांगली झोप लागते: शारीरिक श्रमामुळे रात्री शांत झोप लागते, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे गुणकारी आहे.

Click Here