Tap to Read ➤

इवलासा आल्याच्या तुकडा पण त्याचे १० उपयोग आहेत भन्नाट...

रोजच्या जेवणात आल्याचा वापर करण्याचे आरोग्याच्यादृष्टीने आहेत अनेक फायदे...
पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, गॅस यांसारख्या पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी कच्च्या आल्यासोबत चिमूटभर मीठ खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होतात.
पचनक्रियेचे कार्य सुरळीत चालावे यासाठी आल्याच्या रस पिणे फायदेशीर ठरते.
सर्दी - खोकला झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा करुन प्यायल्यास घशात होणारी खवखव दूर होण्यास मदत मिळते.
स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर रोजच्या जेवणांत आल्याचा वापर करावा, यामुळे स्नायू दुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे स्किन इंन्फेक्शन्स दूर करुन त्वचेवर वाईट बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करतात.
वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीमुळे हदयरोगाची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी रोजच्या आहारात आल्याचा समावेश करावा.
आले रोज खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण हे कमी होण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आलं खावं.
मेंदूचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी व स्मरणशक्ती वाढण्यासाठी आलं वरदान ठरते.
आल्यामध्ये असणाऱ्या अँटीइन्फ्लेशन अ‍ॅसिडमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियाशी लढा देत प्रतिकारशक्ती वाढण्याचं काम करतं.
आल्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या रक्तप्रवाहामध्ये सुधारण होऊन मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो.
क्लिक करा