Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २७ ऑक्टोबर २०२३; आर्थिक लाभ होईल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल.
आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल.
आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल.
आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो.
आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा.
आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल.
आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील.
आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील.
आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील.
आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होतील.
आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळे विपरीत परिणाम होईल.
आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आनंद, उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल.
क्लिक करा