आजचे राशीभविष्य - २५ ऑक्टोबर २०२३; नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आज चंद्र 25 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभ स्थानी असेल. आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल.
आज चंद्र 25 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे.
आपल्यासाठी चंद्र भाग्य स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल
आज चंद्र 25 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टम स्थानी असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल.
आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील.
आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल.
आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल.
आपल्यासाठी चंद्र चवथ्या स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच.
आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील.
आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला.
आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.
आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल.