आजचे राशीभविष्य, १६ फेब्रुवारी २०२४: आर्थिक लाभ संभवतो
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल.
वृषभ- 16 फेब्रुवारी, 2024 शुक्रवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल.
आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल.
आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल.
आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल.
आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील.
आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो.
आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील.
आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा.
आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल.
आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा.