Tap to Read ➤

राशीभविष्य:व्यावसायिक भागीदारीत लाभ,भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल.
आज परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल.
आज कोणत्याही प्रकारच्या संकटापासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही.
आज नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल.
आज शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल.
आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल.
जवळपासचे प्रवास होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल.
आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील.
मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल.
आज खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा.
आजचा वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल.
क्लिक करा