Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा, हितशत्रूंचा त्रास संभवतो

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...?
आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. वाणी व क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे.
आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत.
आज कुटुंबातील वातावरण वाद - विवादाचे राहील. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा.
आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.
आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत.
आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल.
आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल.
आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे.
आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल.
आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.
क्लिक करा