Tap to Read ➤

राशीभविष्य: भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल, मंगल कार्ये ठरतील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आर्थिक लाभ होईल.
आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल.
आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल.
आजचा दिवस आपणासाठी लाभदायक. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. घरात मंगल कार्ये ठरतील. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल.
आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल.
आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल.
उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. अचानक धनलाभ होईल.
मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल.
आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल.
आज अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका.
आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल.
क्लिक करा