Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: पत्नी आणि संततीकडून लाभ होईल, अचानक धनप्राप्ती संभवते

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...?
आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यासंबंधी वरिष्ठांशी विचार-विनिमय होतील.
व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील.
आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
आज मौज-मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. भागीदारीत फायदा होईल.
आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील.
आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. अचानक धनखर्च होईल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.
आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. पाण्यापासून जपून राहा.
आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील.
आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील.
आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल.
आज शक्यतो आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे.
मित्र-स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे.
क्लिक करा