आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल.
आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील.
आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. धन प्राप्तीची संधी मिळेल.
आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.
आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल.
आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल.
नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल.
आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल.
आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल.
आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल.
आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल.
आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल.