Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल
आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील.
आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल.
आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे.
आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील.
उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील.
आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल.
आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल.
आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.
क्लिक करा