Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : घरात वातावरण आनंदी राहील,योग्य ठिकाणी पैसा खर्च होईल

८ सप्टेंबर २०२३ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील.
वृषभ- आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही.
मिथुन- आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल.
कर्क- आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात.
सिंह- आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल.
कन्या- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे.
तूळ- व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल.
वृश्चिक- आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील.
धनु- आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल.
मकर- आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील.
कुंभ- आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल.
मीन- आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात.
क्लिक करा