Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : घरात आनंदाचे वातावरण राहील, नोकरीत सहकार्य मिळेल

७ सप्टेंबर २०२३ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल.
वृषभ- आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील
मिथुन- आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील.
कर्क- आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल.
सिंह- आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल.
कन्या- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे.
तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. द्वेषापासून दूर राहा.
वृश्चिक- मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल.
धनु- आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
मकर- ज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल.
कुंभ- आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जिद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.
मीन- आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल.
क्लिक करा