Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : कुंभसाठी लाभदायक अन् मेषसाठी चिंतेचा दिवस

५ नोव्हेंबर २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो.
वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल.
मिथुन- आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल.
कर्क- आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल.
सिंह- आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते.
कन्या - आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे.
तूळ- आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल.
वृश्चिक- आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील.
धनु- कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर- आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल.
कुंभ- आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील.
मीन- आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे.
क्लिक करा