Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: मेषसाठी आनंदाचा तर वृषभसाठी चिंतेचा दिवस

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ- आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्‍या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन-  आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे.
कर्क- आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते.
सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल.
कन्या- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
तूळ- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल.
वृश्चिक- आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल.
धनु- आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील.
मकर- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते.
कुंभ- आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मीन- आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल.
क्लिक करा