Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य : मानसिक एकाग्रता राहील, अचानक खर्च उद्भवतील
४ एप्रिल २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.
वृषभ - आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल.
मिथुन- आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
कर्क- आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल.
सिंह- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. दैनिक कामात अडथळे येतील.
कन्या - आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील.
तूळ- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल.
वृश्चिक- आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.
धनु- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील.
मकर- आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते.
कुंभ- आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील.
मीन- आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल
क्लिक करा