Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य : सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
३१ जानेवारी २०२५ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल.
वृषभ - आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल.
मिथुन- आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा व आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही.
कर्क- आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे.
सिंह - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील.
कन्या - आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
तूळ- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील.
वृश्चिक - आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल.
धनु- आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल.
मकर- आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल.
कुंभ- आज आपण शरीराने व मनाने उत्साहित असाल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्र - कुटुंबियांसह एखाद्या सहलीला जाऊ शकाल.
मीन - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शरीराने व मनाने उत्साहित असाल.
क्लिक करा