Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : खर्चाचे प्रमाण वाढेल, प्रकृती बिघडेल

३ एप्रिल २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार - विनिमय कराल.
वृषभ - आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील.
मिथुन- आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल.
कर्क- आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल.
सिंह- आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल.
कन्या - आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील.
तूळ- आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील.
वृश्चिक- आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल.
धनु- आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल.
मकर- आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील.
कुंभ- आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मीन- आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल
क्लिक करा