Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील.
आज कामाचा खूप व्याप व खाण्या - पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल.
आज आपण मौज - मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल.
आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील.
आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल.
आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल.
आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही.
आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल.
आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील.
नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल.
क्लिक करा