Tap to Read ➤

मिथुनसाठी लाभाचा अन् वृश्चिकसाठी काळजीचा दिवस

२८ ऑगस्ट २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल.
वृषभ - आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल.
मिथुन- आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळपासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. मित्र व नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल.
कर्क- आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल.
सिंह- आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडे लक्ष द्यावे.
कन्या - आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल.
तूळ- आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील.
वृश्चिक- आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील.
धनु- आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे.
मकर- आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल.
कुंभ- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील.
मीन- आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल.
क्लिक करा