Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य : मनोरंजनाचा बेत ठरवाल, मन आनंदाने भरून जाईल
२७ जानेवारी २०२५ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील.
वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल.
मिथुन- आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल.
कर्क- आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील.
सिंह - आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल.
कन्या - आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील.
तूळ- नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृश्चिक - आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे.
धनु- आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे.
मकर- आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल.
कुंभ- आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल.
मीन - आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल.
क्लिक करा