Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : वृश्चिकसाठी काळजीचा तर कुंभसाठी आनंदाचा दिवस

२६ जानेवारी २०२४ : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो.
वृषभ - आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल.
मिथुन-  आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील.
कर्क- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल.
सिंह- आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील.
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल.
तूळ-  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.
वृश्चिक -  आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
धनु- आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील.
मकर- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल.
कुंभ- आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल.
मीन- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल.
क्लिक करा