Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : व्यवसायात प्रगती होईल, बढतीची शक्यता

२६ ऑगस्ट २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल.
वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल.
मिथुन- आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील.
कर्क- आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील.
सिंह- खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे.
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे.
तूळ- आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये.
वृश्चिक- आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल.
धनु- आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल.
मकर- आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही.
कुंभ- आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल
मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल.
क्लिक करा