Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च होणार नाही,याकडे लक्ष द्या!

२३ नोव्हेंबर २०२३ : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल.
वृषभ - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन- आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल.
कर्क- आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील.
सिंह- आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल.
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील.
तूळ- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
वृश्चिक- आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल.
धनु- आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल.
मकर- आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल.
कुंभ- आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही.
मीन- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल.
क्लिक करा