या राशीला व्यापारात नफा संभवतो; वाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील.
आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील.
आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल.
आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल.
आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.
आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात.
आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल.
आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे.
आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे.
आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो.
आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील.
आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल.