Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता

२ एप्रिल २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे.
वृषभ - आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल.
मिथुन- आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल.
कर्क- आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल.
सिंह- आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल.
कन्या - आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील.
तूळ- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक- आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे.
धनु- आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल.
मकर- आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल.
कुंभ- आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल.
मीन- आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल.
क्लिक करा