Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरुवात कराल; यश, कीर्ती व आनंद लाभेल

१५ सप्टेंबर २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील.
वृषभ - आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल.
मिथुन- आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल.
कर्क- मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल.
सिंह- आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.
कन्या - आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल.
तूळ- आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील.
वृश्चिक- आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील
धनु- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील.
मकर- आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल.
कुंभ- आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन- आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल.
क्लिक करा