Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : आर्थिक दृष्टया लाभदायी, कृती उत्तम राहील

१४ एप्रिल २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील.
वृषभ - आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही.
मिथुन- स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल.
कर्क- आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल.
सिंह- आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्यस्थळी प्रवासाला जाल.
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे.
तूळ- व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत.
वृश्चिक - आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
धनु- आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल.
मकर- आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील
कुंभ- आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल.
मीन- आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात.
क्लिक करा