Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : मनोबल व आत्मविश्वास वाढेल, आरोग्य खूप चांगले राहील

१२ जून २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा.
वृषभ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील.
मिथुन- आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील.
कर्क- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही.
सिंह- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल.
कन्या - आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल.
तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल.
वृश्चिक- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील.
धनु- आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील.
मकर- आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल.
कुंभ- आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल.
मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील.
क्लिक करा