Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : मन अधिक संवेदनशील बनेल अन्..

१० जून २०२४ : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल.
वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा असेल. आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल.
मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र दुसरा असेल. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल.
कर्क- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल.
सिंह- आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल
कन्या - आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल
तूळ- मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक- आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल.
धनु- अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे.
मकर- आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल.
कुंभ- आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल.
मीन- आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे.
क्लिक करा