Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल

१ एप्रिल २०२४ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल.
वृषभ - शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल.
मिथुन- आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल.
कर्क- आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
सिंह- आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल.
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील.
तूळ- आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल.
वृश्चिक- आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल.
धनु- आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल.
मकर- आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील.
कुंभ- आज आपणांस मिळणाऱ्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे.
मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल.
क्लिक करा