Tap to Read ➤
राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२३
काय सांगतोय तुमचा आजचा दिवस
घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा
एखाद्या प्रवासामुळे मनास आनंद होईल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढून आर्थिक लाभाची शक्यता आहे.
बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक चणचण जाणवेल
आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल.
दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये.
शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. एखादी मानहानी संभवते.
नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील.
आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल.
कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यावा. मन शांत राहील. शारीरिक कष्ट होतील.
स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी व राग ह्यावर संयम ठेवावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल.
क्लिक करा