Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य- १५ फेब्रुवारी २०२४: आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष- मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल.
वृषभ- प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल.
मिथुन- समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रां कडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील.
कर्क- घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात.
सिंह- वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
कन्या- बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल.
तूळ- सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील.
वृश्चिक- आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल.
धनु- पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर- शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे.
कुंभ- मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल.
मीन- नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल.
क्लिक करा