Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य- १४ फेब्रुवारी २०२४:अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष- मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
वृषभ- जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल.
मिथुन- व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल.
कर्क- शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही.
सिंह- आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील.
कन्या- आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील.
तूळ- आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल.
वृश्चिक- मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल.
धनु- आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे.
मकर- एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल.
कुंभ- मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा.
मीन- कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल.
क्लिक करा