Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२४: आर्थिक बाजू मजबूत होईल
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष- आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे.
वृषभ- प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल.
मिथून- अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल.
कर्क- आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील.
सिंह- परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील.
कन्या- कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल.
तूळ- कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
धनु- आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल.
मकर- व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील.
कुंभ- मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल.
मीन- विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील.
क्लिक करा