Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, ३१ जानेवारी २०२४: नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.
वृषभ- आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल.
मिथुन- आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल.
कर्क- नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल.
सिंह- खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील.
कन्या- आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.
तूळ- अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल.
वृश्चिक- आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल.
धनु- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल.
मकर- बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल.
कुंभ- आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन- भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील.
क्लिक करा