Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२३

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल.
आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल.
स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल.
द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे.
भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील.
पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील.
परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. प्रकृती यथा तथाच राहील
खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल.
आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल.
अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल
नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल.
क्लिक करा