Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २९ नोव्हेंबर २०२३: अवैध कृत्यापासून दूर राहा

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल.
वृषभ- आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल.
मिथुन- मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.
कर्क- संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत.
सिंह- मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील.
कन्या- नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान - सन्मान होतील.
तूळ- आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील.
धनु- मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल.
मकर- वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल.
कुंभ- सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.
मीन- आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल.
क्लिक करा