Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य ०४ फेब्रुवारी: खर्चाचे प्रमाण वाढेल, वाद टाळू शकाल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल.
वृषभ- आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल.
मिथुन- अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील.
कर्क- . शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील.
सिंह- आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल.
कन्या- आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल.
तूळ- आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे.
वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील.
धनु- रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. एखादा अपघात संभवतो.
मकर- सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल.
कुंभ- व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल
मीन- आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.
क्लिक करा