Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, ०३ फेब्रुवारी २०२४: अचानक धनलाभ संभवतो
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल.
वृषभ- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल.
मिथुन-नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल.
कर्क- मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल.
सिंह- कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील.
कन्या- आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील.
तूळ- आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल.
वृश्चिक- शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी.
धनु- आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल.
मकर- कुटुंब व संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.
कुंभ- शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील.
मीन- व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.
क्लिक करा