Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक स्थितीत सुधारणा होईल!
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल.
आपणास जमीन - जुमल्याच्या कामात मदत मिळेल. प्राप्तीचे नवीन स्रोत ऊपलब्ध होतील, ज्याचा आपणास लाभ होईल. शासनाकडून सुद्धा आपणास लाभ होईल. ह्या दरम्यान आपणास कर्जाची परतफेड करण्यात सुद्धा मदत होईल.
नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल. व्यापारात विकासाच्या दृष्टीने नव्या योजना अंमलात आणू शकाल. वरिष्ठांशी वाद संभवतात. कन्या राशीतील सूर्याचे गोचर भ्रमण आपल्यासाठी अनुकूल आहे.
आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपार नंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा व रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा.
चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन ह्यामुळे मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो. सूर्याचे कन्या राशीतील गोचर आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ह्या गोचर भ्रमणा दरम्यान तीन ग्रहांची युती होत आहे, ज्याचा आपणास लाभ होईल.
व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. सूर्याचे भ्रमण आपल्याच राशीतून होत आहे. अशा परिस्थितीत हे भ्रमण आपणास विशेष लाभदायी होईल.
सूर्याच्या कन्या राशीतील गोचर भ्रमणाचा आपल्यावर चांगला प्रभाव होत असल्याचे दिसून येईल. असे असले तरी ह्या दरम्यान आपणास थोडे सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल.
सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते. सूर्याच्या कन्या राशीतील गोचर भ्रमणाचा प्रभाव आपल्यावर होत असल्याचे सुद्धा दिसून येईल.
मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. हि सूर्य संक्रांति आपल्यासाठी चांगलीच आहे. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. आपणास प्राप्ती सुद्धा चांगली होईल.
गूढ विषयांत गोडी निर्माण होईल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपार नंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. मनात निराशेचे ठग दाटतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. शेअर- बाजारात यशस्वीपणे गुंतवणूक करू शकाल.
दांपत्य जीवनात गोडवा राहील. शरीर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहील. सूर्याचे कन्या राशीतील भ्रमण आपल्यासाठी विशेष चांगले नाही. असे असले तरी काही बाबतीत ह्याच गोचराचा अनुकूल प्रभाव असल्याचे दिसू शकते.
विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. दुपार नंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण जास्त राहील. घरातील वातावरण शांतिदायक राहील.