आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ व कामात यश मिळेल; जाणून कसा आहे तुमचा आजचा
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आज मित्रांच्या सहवासात आपण आनदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील.
नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल.
आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल.
आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये.
आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही.
आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल.
आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल.
28 फेब्रुवारी, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच.
आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल.
आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल.
आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल.
आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा.